अमरावती शिक्षकचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये शिंंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली असून किरण सरनाईक यांचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान पराभूत उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव झाल्यानंतर ते भावूक झालेले पाहायला मिळाले. अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार श्रीकांत देशपांडे ७ हजार १७ मतं घेत पराभूत झाले आहेत. त्यामुळे देशपांडे यांचा मोठा पराभव झाला आहे.