पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात सुरक्षेसाठी नेरळ आणि माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या काळात माथेरान आणि अमन लॉज दरम्यानची शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू असते. माथेरान हील स्टेशनवरील नेरळ ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन आता ३० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे पावसाळ्यातील जून ते ऑक्टोबर महिन्यात नेरळ ते माथेरान ही थेट सेवा बंद ठेवली जाते.