Chandrapur News : चंद्रपूर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर बुधवारी पहाटे मालगाडीच्या धडकेत एका मादी सांबराचा जागीच मृत्यू झाला. वनविकास महामंडळाच्या जुनोना वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४८२ मध्ये ही घटना घडली. चंद्रपूर : चंद्रपूर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर बुधवारी पहाटे मालगाडीच्या धडकेत एका मादी सांबराचा जागीच मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की, सांबराच्या शरीराचे अवशेष सुमारे १०० मीटरपर्यंत विखुरले होते. त्याचा जबडाही तुटून रेल्वे रुळावर पडला होता.