डब्यातील वॉशरूममध्ये नव्हतं पाणी... २४ जणांच्या कुटुंबाला सोडावी लागली ट्रेन; रेल्वेला १६ हजारांचा दंड. Consumer Court Fine South Western Railway Toilet: कर्नाटकातील एका जिल्हा ग्राहक न्यायालयाने दक्षिण पश्चिम रेल्वेला ग्राहकांना सेवा पुरवण्यात अपयश आल्याबद्दल दोषी ठरवून दंड ठोठावला आहे. एक पुरूष २३ सदस्यांचे कुटुंब घेऊन रेल्वेतून प्रवास करत होता. त्यात चार मुलांचा देखील समावेश होता. तो रेल्वेच्या बोगीत २४ जणांचे कुटुंब रेल्वेतून घेऊन जात होत.