Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : कोटा पूर्ण नाही झाला तर ज्याची सर्वाधिक मत त्याला विजयी घोषित करण्यात येतं, मात्र सध्या तरी प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी अद्यापही सुरु आहे. यात शिक्षक मतदारसंघाच्या दोन आणि पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा आहेत. काल(मंगळवारी, ता 27) सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे.