पुणे : विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. यावेळी या निवडणुकांमध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा दारुण पराभव झाला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीदरम्यान ते बाद झाले. या निकालानंतर भाजप पुरस्कृत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पहिल्या काही फेऱ्यानंतरच दत्तात्रय सावंत सावंत तिसऱ्या क्रमांकावर घसरले.