Gokul Election: जर महायुतीकडून या बैठकीला दांडी मारली गेली तर गोकुळच्या अध्यक्षपदाचे त्रांगडं कायम राहण्याचे चिन्हे आहेत. अध्यक्ष निवडीसाठी उपस्थित राहायचं की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महायुतीचे नेते गोकुळ संचालकांना भेटून विशेष विमानाने गोव्यातून कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. सहलीवर असलेल्या महायुतीच्या संचालकांच्या भेटीसाठी विशेष विमानाने महायुतीचे नेते गोव्याला पोहोचले होते.