Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित झाला आहे. अजून त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, पराभव दिसताच शिवसेन. मात्र, पराभव दिसताच शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप हे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. शिक्षकांचा आमदार शिक्षकच व्हावा, यासाठी उभा केलेला लढा कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. .एकनाथ शिंदेंनी सानप यांना पाठींबा जाहीर केला होता. शिवसेनेची यंत्रणा देखील सानप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती.