Pune Crime - इतर शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता. पुणे : कुराश खेळाच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत १४ पोलिस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील काही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आता बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे इतर शासकीय विभागांत नोकरी मिळवणाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता असून, संबंधित विभागांशी पुणे पोलिसांकडून पत्रव्यवहार सुरू आहे.