Pune MLC Election Result 2026: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीदरम्यान आवश्यक मतांचा कोटा गाठण्यात अपयशी ठरल्याने आसगावकर मतमोजणी प्रक्रियेतून बाहेर पडले असून, त्यांच्या पराभवामुळे भाजप पुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.Vidhan Parishad Election Result 2026 : २२ तासांचा सस्पेन्स, धक्कादायक आकडेवारी समोर!