Pune Vidhan Parishad Result 2026: पदवीधरमध्ये हर्षदा जाधव-देशमुख आघाडीवर; शिक्षक मतदारसंघात गावडे ६,७०० मतांनी पुढे. पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) हर्षदा जाधव-देशमुख यांनी भाजपच्या स्मिता जाधव यांच्यावर आघाडी घेतली होती. शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी पहिल्या फेरीअखेर शिंदे सेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्यावर ६ हजार ७०० मतांची आघाडी घेतली होती.