Amravati MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अनेकदा उमेदवारांना आपण लोकांसाठी भरपूर काही करतो म्हणून विजयाची अपेक्षा असते. पण असं होत नाही, तेव्हा हताशा येते. असंच भाजपच्या महिला बंडखोर उमेदवाराचं झालं आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांचा स्टेट्स चर्चेत आलं आहे. विधान परिषदेत निवडणुकीतील पराभव त्यांच्या जाम जिव्हारी लागला आहे.