महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, 85 वर्षीय शरद पवार रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून काही उपाययोजना केल्या असल्या तरी, सरकारच्या निष्क्रियतेवर पवारांनी बोट ठेवले आहे. राज्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला असून राज्य सरकारनेही दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारने दुष्काळ निवारणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तसेच दुष्काळ निवारणासाठी उपाय योजनाही केल्या आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचीही व्यवस्था केली आहे.