‘शक: ट्रस्ट नो वन’ या सीरिजमध्ये परिणीती आणि जेनिफर दोघींनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजच्या यशानिमित्त आयोजित पार्टीतून सुरू झालेली चर्चा आता जेनिफरच्या स्पष्टीकरणामुळे पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. Jennifer Winget: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘शक: ट्रस्ट नो वन’ या वेब सीरिजच्या सक्सेस पार्टीतील केक कटिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली.