भारतीय सिनेसृष्टीत एक अशी फ्रँचाइजी आहे, जिची कथा एका अशा पात्राभोवती फिरते, ज्याला पडद्यावर फक्त पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ मिळाला. नंतर त्याच्याच नावाने पुढील फ्रँचाइजी गाजले. भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे की निर्मात्यांनी त्यांच्या फ्रँचाइजी बनवल्या आहेत. गोलमाल, हेराफेरी, धमाल आणि सिंघम या अशाच काही फ्रँचाइजी आहेत. पण यापैकी जवळजवळ सर्वच चित्रपटांमधील कथा त्याच पात्रांभोवती फिरते, जी पडद्यावर दिसतात.