पुणे पदवीधर मतदारसंघ 2026 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हर्षदा जाधव आघाडीवर आहेत. त्यांना 1,11,279 मते मिळाली असून विजयासाठी 1,816 मतांची गरज आहे. भाजपच्या स्मिता जाधव यांना 1,02,427 मते मिळाली आहेत. कोट्यासाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या 2026 च्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा जाधव आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे.