महाबळेश्वर : जगभरातील पर्यटकांना धुक्याची चादर, निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ घालणारे महाबळेश्वर सध्या धुरळ्याने त्रस्त झाले आहे. महाबळेश्वर-पाच. महाबळेश्वर-पाचगणी मार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे, उखडलेले डांबर आणि धुळीचे लोट यामुळे नागरिक व पर्यटकांची अक्षरशः दमछाक होत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार बैठका होत असल्या, तरी प्रत्यक्ष कामांचा वेग आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे ‘कामे कमी आणि बैठकाच जास्त असे चित्र आहे.