सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढली आहे. मागील बुधवारी १३ हजार क्विंटलच्या घरात असलेली आवक या मंगळवारी थेट ३३ हजार क. विशेष म्हणजे, आवक वाढूनही कांद्याच्या सरासरी दरात ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. कमाल दरही ७ हजार १०० रुपयांवरून ८ हजार रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील बुधवारी १३१ गाड्यांमधून १३ हजार १८० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.