सोलापूर : नवरात्रौत्सवाच्या कालावधीत तुळजापूरच्या यात्रेसाठी परिवहन महामंडळाने विभागातर्फे भाविक प्रवाशांसाठी ५९१ विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले होते. दि. ११ त. ११ ते २६ ऑक्टोबर या काळात महामंडळाच्या तिजोरीत १ कोटी २८ लाख ९७ हजार ५१४ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यासाठी बसेसच्या ३ हजार ५८ फेऱ्या झाल्या..एकूण २ लाख २० हजार ७२६ किलोमीटरच्या अंतरातून तब्बल १२ लाख ६७ हजार ६ प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसने प्रवास केला.