सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी बबन आवताडे, श्रीदीप हसापुरे यांच्यासह सहाजणांनी अ. तसेच, अर्ज खरेदी करण्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. २७) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा. संजयमामा शिंदे, रणजितसिंह शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज खरेदी केले आहेत..विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सुशील बबनराव आवताडे, सिद्धेश्वर बबनराव आवताडे, बबन बाबुराव आवताडे आणि श्रीदीप सुरेश हसापुरे यांनी अर्ज दाखल केले आहेत.