बार्शी : शहरातील कासारवाडी रोडवर महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा बार्शी शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या गुन्ह्यातील एका आर. या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसरा फरार आहे. सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महादेव शंकर पवार (वय 33, रा. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.