कोल्हापूर : ऊस दर जाहीर करा; अन्यथा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील विविध भागांत सुरू असलेली ऊसतोडणी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटन. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने येथे पोलिस दाखल झाले. यावेळी ताब्यात घेण्यावरून कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. झटापटीत कार्यालयाची काच फुटल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. .स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांची भेट घेतली.