आशिष शिंदे कोल्हापूर : मसाई पठारावर फॉरेनच्या पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. पॅलिड हॅरिअर, मॉन्टॅग्यूज हॅरिअर, लेसर केस्ट्रल आणि युरोपियन रोलर या स्थलांतरित पक. मात्र, हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांच्या स्थलांतरावर यंदा ‘अल निनो’च्या प्रभावाचे सावट आहे. .कमी पर्जन्यमान, वाढते तापमान आणि नैसर्गिक अधिवासातील बदलांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतराच्या वेळा, मुक्कामाची ठिकाणे आणि खाद्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.