कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (केडीसीसी) निवडणूक लांबणीवर पडणार असून, या निर्णयाने जिल्ह्यातील सुमारे एक हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबणार आहेत. .दरम्यान, बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील १२३ हरकतींच्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून गुरुवार (ता. २९) पर्यंत अपेक्षित असलेल्या निकालालाही आता प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे..