कोल्हापूर : शहरात सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा सराईत गुंडांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन मोपेड, एक कोयता, मिरचीपूड, सात मोबाईल. सोमवारी रात्री आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात ही कारवाई करण्यात आली..विजय मोहन पुजारी (वय २०, रा. करवीर), प्रमोद धर्मेंद्र कसबेकर (२०, रा. टेंबलाई नाका), संतोष महादेव मोटे (३१), पृथ्वीराज रवी वावरे (२०), चेतन कोंडिबा लोंढे (२०, तिघेही रा. राजेंद्रनगर), साद शौकतअली मुजावर (२९, रा. यादव कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत..