कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’कडून महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर चालविला जात आहे. मात्र, सद्यस्थि. मात्र, सद्यस्थितीत कच्च्या मालाचे दर वाढले असून, पशुखाद्य विक्री दर ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे पशुखाद्य विक्री तोट्याची ठरत आहे. त्याचबरोबर इंधन दरवाढ आणि पॉलिथिन फिल्मच्या किमतीत झालेल्या वाढीचाही फटका ‘गोकुळ’ला बसत आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ला २४ कोटी रुपयांचा आर्थिक तोटा झाल्याचे समजते. .‘गोकुळ’ दूध संघावर मे महिन्यापासून प्रशासक नियुक्त केले आहेत.