Pradeep Purnekar Case : सरकारने नेमलेल्या एसआयटीवर आमचा विश्वास नाही, आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आणि सीबीआय चौकशीची मागणी करू, असं प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांनी म्हटलं. . ठाणे : ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटून गेला असला तरी पोलीस अद्याप मास्टरमाईंडपर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा राम पुर्णेकरांनी यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर थेट आरोप केला आहे.