Indian Railway 45 Paise Travel Insurance Scheme : भारतीय रेल्वेने आता काउंटरवरून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठीही 45 पैशांत 10 लाखांचा प्रवास विमा सुरू केला आहे. मुंबई : भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ ऑनलाईन (IRCTC) तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास विम्याची (Travel Insurance) सुविधा उपलब्ध होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रेल्वे बोर्डाने या योजनेचा विस्तार केला आहे.