Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात पोलीस मिनाक्षी शिंदे आणि तिच्या पतीला पाठीशी घालतात आणि आम्हालाच आरोपी म्हणून वागवतात, असा आरोप विजेता पूर्णेकर यांनी केला. . ठाणे : ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला जवळपास महिना होत आला असला तरी यामागच्या मास्टरमाईंडचा शोध पोलिसांना घेता आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पूर्णेकर कुटुंबीयांनी आणि हजारो नागरिकांनी नौपाडा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला.