अबू धाबी बिग तिकीट ड्रॉमध्ये चार भारतीयांचे नशीब चमकले आहे. त्यांना प्रत्येकी 200 ग्रॅम सोन्याची बिस्किटे मिळाली, ज्याची किंमत प्रत्येकी 23 लाख रुपये आहे. ऑफिस बॉय, फ्रीलान्सर, व्यावसायिक आणि अभियंता अशा या विजेत्यांनी अनपेक्षितपणे हे मोठे बक्षीस पटकावले. . परदेशात काम करण्यासाठी गेलेल्या भारतीयांचं नशीब चमकलं आहे. त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांना मोठं बक्षीस लागलं आहे. अबू धाबीत कामाला गेलेल्या या चार भारतीयांना खरोखरची लॉट्री लागली आहे.