Maharashtra Drought Gujarat Water Supply: दुष्काळाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. उकाई धरणातून ५ TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. यावर आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार आहे. नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.