चंद्रपूर : बंधाऱ्याच्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारणाऱ्या कोरपणा येथील कृषी सहायकाला. हरी विठ्ठलराव उदगीरे (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या कृषी सहायकाचे नाव असून, या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे..हरी उदगीरे हे कोरपणा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील ४६ वर्षीय तक्रारदाराने बंधाऱ्याचे काम केले होते.