फोटो-13372 सप्तशृंगगड ः श्री सप्तशृंगी मातेस महावस्त्र पूजाविधी साहित्य अर्पण करताना दोन्हीही ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त-१ विवेक सोनुने, व्यवस्थापक अमित टोकेकर आदी. सप्तशृंगीमातेला त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे महावस्त्र अर्पण कावडीच्या तीर्थाने महाअभिषेक; पैठणीसह अलंकारांचे समर्पण सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २६ : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग निवासिनी आई भगवतीला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी (ता. २५) श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टतर्फे भरजरी पैठणी महावस्त्रासह विविध पूजासाहित्य अर्पण करण्यात आले.