मेन शेजारी घेणे 13374 सप्तशृंगगड : परतीच्या पायरी परिसरात बांधलेल्या निवारा शेडची पाहणी करताना आमदार चित्रा वाघ. शेजारी रमेश पवार, संदीप बेनके, धनेश गायकवाड, भाऊ निमकर आदी. २७ : सप्तशृंगगडावर भाविकांच्या सोयीसाठी आमदार चित्रा वाघ यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या निवारा शेडची त्यांनी पाहणी केली. या वेळी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गडावरील भाविकांच्या सुविधांचा आढावा घेतला. भविष्यातही भाविकांच्या सोयींसाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.