पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा २८ ऑक्टोबरपासून ४० विषयांसाठी ३ हजार ३४६ विद्यार्थ्यांची नोंदणी; १ नोव्हेंबरपर्यंत परीक्षा. प्रवेशपूर्व परीक्षा ३३४६ विद्यार्थ्यांची नोंदणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२७ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) २०२६ चे आयोजन २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एकूण तीन हजार ३४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ४० विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.