पहिल्या फेरीतील मतमोजणी झाली आहे. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीची 3903 मतं मिळाली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे तथा बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या पसंतीची 2209 मतं मिळाली आहेत. Amravati MLC Election Result 2026 Updates : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे शिक्षक, पदवीधर आणि अमरावतीच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीकडे तर सर्वांचेच लक्ष लागले आहे.