हवामान विभागाने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यासाठी अंदाज वर्तवला आहे. यामध्ये राज्यात कुठे कुठे पावसाची हजेरी असणार, कुठे हवामान कोरडे राहणार याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, चला जाणून घेऊ... ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळेजण प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहेत. दिवाळी तोंडावर आली आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान कसं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता उद्या म्हणजे २८ ऑक्टोबरसाठीचा हवामानाच अंदाज समोर आला आहे.