Mala Sinha : सुप्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा यांच्या एका वक्तव्यानं खळबळ उडालेली. त्यांनी वेश्याव्यवसायाचा उल्लेख केलेला. काय घडलेलं? जाणून घ्या. एकेकाळी आपल्या सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट आला, ज्यानं संपूर्ण बॉलिवूडला हादरवून सोडलं. मोठ्या सुपरस्टार्ससोबत हिट चित्रपटांमध्ये काम केलेली ही सौंदर्यवती, आयकर विभागानं तिच्या घरावर छापा टाकल्यावर अचानक वादात सापडली. तिच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानं खळबळ उडाली.