प्रदीप पूर्णकर हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक काळ एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या पतीची यापूर्वी सात वेळा चौकशी झाली होती. पूर्णकर यांच्या मुलाने एका व्हिडिओद्वारे शिंदे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर हे प्रकरण आणखी तापले आहे. ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणात आता मीनाक्षी शिंदेंची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात त्यांची गेल्या तीन तासांहून अधिक काळ चौकशी सुरू आहे. दुपारी १२.४५ वाजता त्या पथकासमोर हजर झाल्या होत्या.