जगात इथेनॉल कारची क्रेझ वाढत आहे, ब्राझील नंतर आता भारताने देखील E100 कारना हिरवा झेंडा दाखवला आहे. कोण-कोणत्या देशात या कारचा दबदबा आहे. भारतीय बाजाराची नेमकी काय आहे तयारी, वाचा ए टू झेड माहिती... देशात महागडे पेट्रोल आणि प्रदुषणाने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी केंद्राने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने भारतात १०० टक्के इथेनॉल म्हणजे E100 आणि E85 इंधनाला कारमध्ये वापर करण्यासाठी कायदेशीर मंजूरी दिली आहे.