भूमिअभिलेख व भातसा पाटबंधारे विभागाचे अधिकारी दाखल; पोलिस बंदोबस्त नव्हता. मुरबाड) येथील काळू धरणाच्या संभाव्य बाधितांच्या पुनर्वसनासाठी, मांदोशी येथे प्रस्तावित भूसंपादनाची संयुक्त मोजणी मंगळवारी स्थानिक शेतकरी , आदिवासी आणि महिलांनी विरोध करून बंद पाडली. मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालय, मुरबाड आणि भातसा पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी-कर्मचारी आले होते. मात्र, विरोधामुळे सर्वेक्षणाचे काम थांबवून त्यांना परतावे लागले.या पुनर्वसन करण्याच्या जागेस अनुसरून अधिकारी-कर्मचारी सकाळी सुमारे ११.४५ वाजता जागेची संयुक्त माेजणी करण्यासाठी मांदोशी येथे दाखल झाले.