Umred Karhandla Wildlife Sanctuaryभंडारा : उमरेड- कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या बासोरा-बोरगाव-वेलतूर कालवा मार्गावर वाघाच्या हल्ल्यात. अमित भीमराव राऊत असे मृत युवकाचे नाव असून, तो बासोरा येथील रहिवासी होता. अवघ्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या घटनेमुळे बासोरा आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..मिळालेल्या माहितीनुसार, अमित राऊत हा अन्य चार मजुरांसह वेलतूर येथे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम करण्यासाठी गेला होता.