Alibag Farmer ID Registration अलिबाग : केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे अलिबा. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी नोंदणी १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी केले आहे. विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या आगामी २४ व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणीबाबत तत्परता दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे..