Pune Metro Line 3 : पीएमआरडीएकडून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपच्या (सार्वजनिक-खासगी भागीदारीत) माध्यमातून ही मेट्रो मार्गिका उभारण्यात आली आहे. पुणे : पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या 23.3 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन 3 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन (व्हर्च्युअल) पद्धतीने करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मेट्रोच्या या मार्गावरील 23 पैकी 17 स्टेशन्स उद्घाटनासाठी तयार आहेत, तर 6 स्टेशनचे काम अद्याप सुरू आहे.