Pimpri-Chinchwad Police Death: पिंपरी शहराला ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी कर्तव्य बजावत असताना अमली पदार्थ विरोधी पथकातील ३८ वर्षीय हवालदार जावेद बागसिराज यांचे रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयित तस्कराला पकडण्यासाठी पाठलाग करत असताना गुन्हे शाखेतील एका पोलिस अंमलदाराला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुसरा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.