#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics Farmers Drought aid: राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Farmers) 5000 रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपूर्वी (Diwali 2026) देण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे शेतकऱ्यांना मिळतील. मात्र, आता यापैकी 5000 रुपये शेतकऱ्यांना आगाऊ देण्यात येणार आहेत. या मदतीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे राज्य सरकारला वाटते.