अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वाढदिवसानिमित्त पती भूषण शिवतारेने शेअर केलेली खास पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिच्यासाठी भूषणने नेमकं काय लिहिलं? त्याच्या प्रेमळ शुभेच्छा आणि खास फोटोंमधून पाहा या नात्यातील सुंदर क्षण! मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या वाढदिवसानिमित्त पती भूषण शिवतारेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. तिची सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेहमीच सोबत राहण्याचे आश्वासन देत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि अभिनेता भूषण शिवतारे यांच्यासाठी यंदाचा वाढदिवस खास ठरला आहे.