संजय राऊत यांनी झाडे तोडणाऱ्यांवर तीव्र टीका केली असून, त्यांना कसाबचे बाप असे संबोधले आहे. मुंबईत अडीच हजार, तर चंद्रपुरात ५ हजार झाडे तोडल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणाचा नाश करणाऱ्या कंपन्यांची बाजू घेतल्याबद्दल त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावरही कठोर शब्दांत हल्ला चढवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी झाडांच्या कत्तलीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. झाडे तोडणाऱ्यांना त्यांनी दहशतवादी कसाबचा ‘बाप’ असे संबोधले.