Maharashtra Vidhan Parishad Election Result 2026: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नितेश कराळे गुरूजींवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर ते धायमोकलून रडले. आता त्याचाच त्यांना फायदा होईल, असा दावाही करण्यात येत आहे. महेश शिंदे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानापूर्वी एक हायहोल्टेज ड्रामा झाला. नितेश कराळे मास्तरांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. त्यांना पक्षाने 6 वर्षांकरीता निलंबित केले.