निरोगी आणि फिट राहण्यासाठी केवळ व्यायाम किंवा डाएटच नाही, तर रोजच्या छोट्या सवयीही महत्त्वाच्या ठरतात. माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने स्वतःच्या आरोग्यासाठी कोणत्या ६ सवयी पाळतात, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. येथे जाणून घ्या सविस्तर. निरोगी आणि फिट राहण्यासाठी महागडे जिमचे साहित्य, कठीण डाएट किंवा तासनतास व्यायाम करण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही छोट्या सवयी लावल्या तरी आरोग्यात सकारात्मक बदल घडू शकतात.